कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोरे नंबर एक येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक अन्नसंस्कृती, पोषणमूल्यांची जाणीव आणि उद्योजकता विकसित करण्याच्या उद्देशाने रानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार असा सयुक्तिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतअजय रावराणे सरपंच ग्रामपंचायत लोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे व विक्री स्टॉलचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पौष्टिक आहाराविषयी जागरूकता आणि व्यवहारज्ञान विकसित होत असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केल्यामुळे मुलांच्या व्यवहार ज्ञानाला साधना मिळेल असे सरपंच यांनी यावेळी उद्गार काढले.
उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, स्थानिक कृषी उत्पादने तसेच आठवडी बाजाराच्या माध्यमातून विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य माजी विद्यार्थी शिक्षणप्रेमीआणि मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक,सतिश गोसावी मनोहर मराठे,दिपक काळेल रचना गवाणकर,सारीका परीट,अंगणवाडी सेविका मदतनीस, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित नरेश गुरव,सुमन गुरव,अनंत रावराणे, बाबा रावराणे,विजय रावराणे ,रमेश रावराणे सचिन सावंत, सदानंद गुरव तसेच इतर सर्व मान्यवरांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.












