अवैध दारूने खचाखच भरलेल्या ट्रकसह 55 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

*ओसरगाव हायवे ट्राफिक पोलिसांची दमदार कामगिरी*

*कणकवली (प्रतिनिधी) :* खारेपाटण येथील महामार्ग पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राच्या पथकाने तळेरे औदुंबरनगर येथे आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 38 लाख 40 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पथकाने रविवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी पकडली. या कारवाईत 17 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विजय बिर्जे, हवालदार एकनाथ साळसकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, कॉन्स्टेबल खडपकर, कॉन्स्टेबल सागर परब यांनी केली.

ओसरगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना तळेरे औदुंबरनगर येथे हायवेवर संशयित आयशर टेम्पो क्रमांक MH 42 BU 1250 आढळून आला. टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे 800 बॉक्स सापडले. प्रत्येक बॉक्स मध्ये 180 मिली.मापाच्या 48 बॉटल होत्या. लागलीच हायवे ट्राफिक पोलिसांनी आयशर टेम्पोसह चालक नितीन रमेश तांबोसकर ( वय 37 वर्षे, रा. चराठे टेम्बवाडी, सावंतवाडी ) याला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देऊन पोलीस अंमलदाराना घटनास्थळी बोलावून घेत पंचनामा करून सर्व मुद्देमाल कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिला. याबाबत आरोपी नितीन चांदोसकर विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!