प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत ; राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाचे मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते व कणकवली शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांच्या निवेदनावर प्रशासनाने सकारात्मक दखल घेतल्याबद्दल जिल्हा व तालुका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, कणकवली यांनी दि. १४ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राजेंद्र पेडणेकर यांना लेखी पत्र देत, संबंधित प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल व त्याबाबत वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या पत्रानंतर राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना पेडणेकर म्हणाले, “या विषयासाठी मी गेली ३३ ते ३५ वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. आज त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळण्याची आशा निर्माण झाली असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचा आनंद आहे.”

यावेळी त्यांनी कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याप्रती आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच समाजसेवक संजय बाबी मालंडकर आणि या प्रयत्नात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत, मार्गदर्शन व सल्ला देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

यावेळी व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजी मार्केट), अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथील सर्व व्यावसायिक बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!