गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी चिंदर ग्रामपंचायतीतील विकसित भारत रोजगार अभियानाच्या कामांची केली पाहणी

आचरा (प्रतिनिधी) : विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) अंतर्गत चिंदर ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच चिंदर ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड, घरकुल योजना आणि रोजगार हमी योजनेंतर्गत होत असलेल्या कामांचे कौतुक केले.उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणीबद्दल रोजगार सेवक दिगंबर जाधव यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.यावेळी ए.पी.ओ. गावंकर, रोजगार सेवक दिगंबर जाधव, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!