चिंदर अपराजवाडीत सौर हायमास्ट दिव्याच्या कामाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीवस्तीच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२६-२७ अंतर्गत चिंदर अपराजवाडी येथे सौर हायमास्ट दिवा बसविण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. गणेश पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विकासकामाचा प्रारंभ करण्यात आला.

अपराजवाडी परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित व पुरेशा प्रकाशाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच वस्तीच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने सौर हायमास्ट दिवा बसविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असून, सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने विजेची बचतही होणार आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, देवेंद्र हडकर, संतोष अपराज, सागर अपराज, सूर्यकांत अपराज, सर्वेश अपराज, शंकर अपराज, रवींद्र अपराज, रोशन अपराज, पिंटू साळकर, संदिप अपराज यांच्यासह अपराजवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!