कणकवली (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल ओसरगांव – बोर्डवे हायस्कूल येथे “हर घर तिरंगा ” अंतर्गत 9 ऑगस्ट क्रांती दीन निमित्ताने समूह गीत स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत विजयी 1 ते 3 क्रमांक प्राप्त संघाला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.दीपक आळवे सर यांनी विद्यार्थ्यांना 9 ऑगस्ट क्रांती दीन,अणुबाँब नागासाकी दीन व आजच्या जागतिक आदिवासी दिनाचे महत्व व माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी कार्यक्रमाचे व शाळा समिती अध्यक्ष संस्थाचालक सखाराम येंडे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात क्रांतिकारकांचे योगदान,त्यांना झालेल्या शिक्षा ,विद्यार्थ्यांची आजची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले.संस्थाचालक बबली राणे यांनी विचार व्यक्त केले, मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी प्रास्ताविक व समूह गीतांचे परीक्षण केले.या कार्यक्रमास लिपिक संतोष राठवड,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.












