देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त १० एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या १० तारिखला सेवाभावी उपक्रम साजरा करण्याचा संकल्प भाजपा देवगड तालुल्याच्यावतीने केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दि १० ऑगस्ट २०२६ रोजी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मा.आमदार अजितराव गोगटे, जेष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भूजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर,नगरसेवक गटनेते शरद ठुकरल, युवामोर्चा शहराध्यक्ष दया पाटील,शक्तीकेंद्र प्रमुख उल्हास मणचेकर,गणपत गावकर, सुभाष धुरी,नगरसेवक संतोष तारी,चंद्रकांत कावले, मच्छिमार नेते ज्ञानेश्वर खवळे, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, व्हि.सी.खडपकर, पदाधिकारी अमोल ठुकरुल, पंकज दुखंडे, रविंद्र चिंदरकर, सरपंच गोपाळ रुमडे आदी पदाधिकारी लोकप्रतिधी कार्यकर्ते उपस्थित होते.
१. देवगड जामसंडे नगरपंचायतच्या सक्शन व्हॅन वरती कामगिरी करणारे कर्मचारी यांचा शाल श्रीफळ मिठाई पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून हृद्य सत्कार करण्यात आला
२. दिवंगत मिलिंद घाडी (तळवडे) यांच्या मुलांसाठी शैक्षाणिक मदतीसाठी भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने छोटासा हातभार म्हणून आर्थिक मदत
३. महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या खासदार निधीतून मंजूर असलेल्या श्री.मो.गोगटे विद्यामंदिर जामसंडे येथील विद्यार्थ्यांसाठी अद्यायवत शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले.












