देशविदेशातील 80 हून अधिक लोकवाद्यं वाजवणारा जादुगर
आचरा (प्रतिनिधी) : जगभरातील ऐंशी पेक्षा जास्त प्रकारची लोक वाद्ये वाजवण्याची कला अवगत असणारे चिंदर गावचे मुळ रहिवासी व सध्या मुंबई निवासी मधुर सुहास पडवळ यांना त्यांच्या मातृभुमीत चिंदर नागोचीवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात चिंदर नागोचीवाडी युवक मंडळ मुंबईचे अध्यक्ष दादु पडवळ व चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सत्कारा नंतर बोलताना मधुर म्हणाले की माझा मातृभूमीत झालेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. हा सत्कार मला नेहमी प्रेरणा, बळ देईल. माझी नाळ हि या गावाशी जोडलेली असून गावाने मला खूप काही दिले आहे. आपल्या आई-वडीलांनचाही या यशात मोठा वाटा आहे असाही उल्लेख मधुर यांनी केला.
यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ- महेंद्र मांजरेकर, दादु पडवळ, डाँ. महेश पडवळ, योगेश पडवळ, यदुनाथ पडवळ, दत्तात्रय पडवळ, सतिश नलावडे व नागोचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.












