फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार समाज परिवर्तन घडवणारे-प्राचार्य डॉ.ए डी कांबळे

चिंचवली येथे सयुंक्त जयंती महोत्सव संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या समाजातील युवक हा बेरोजगार झाला असून नीराशेचे जीवन जगत आहे.मात्र या युवकांनी फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार आत्मसात केल्यास युवकांना सम्यक दिशेने नेणारे व समाज परिवर्तन घडवणारे आहेत.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी चिंचवली (बौद्धवाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना काढले.

आदर्श बौध्द विकास मंडळ चिंचवली,मुंबई/ग्रामीण व आम्रपाली महीला मंडळ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयु.बाळकृष्ण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या भ. गौत्तम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घघाटन चिंचवली गावचे सरपंच श्री अशोक पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,युवा धम्म प्रवचक प्रतीक पवार,धम्ममित्र अजय तांबे, खारेपाटण कॉलेजचे प्रा.वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,पोलीस पाटील दिगंबर भालेकर,तंटामुक्ती अध्यक्ष महेश बांदिवडेकर, ग्रा.पं.सदस्य बळीराम भालेकर,बौध्दजन सेवा संघ विभाग खारेपाटण मुंबई संघटनेचे अध्यक्ष दीपक कोर्लेकर,ग्रामीण अध्यक्ष मोहन पगारे,सचिव – मंगेश कांबळे,दीपक जाधव,जितेंद्र कदम, योगेश पाटणकर,आदर्श बौध्द विकास मंडळ चिंचवली मुंबई शाखेचे. अध्यक्ष सचिन कांबळे, ग्रामीण शाखा अध्यक्ष रवींद्र कांबळे आम्रपाली महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ रत्नमाला कांबळे,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री महादेव कृष्णा पवार,दीपक कदम (आरगावकर)आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पंचशील ध्वजारोहण व बौद्ध धम्म पूजा पाठ घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी उपस्थित बौधाचार्य वागदेकर गुरूजी यांनी पंचशील त्रिसरन व धार्मिक पूजापाठ विधी घेतला.यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला.उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
” आपल्या समाजातील युवकांनी आपलेअसलेल्या श्रद्धा स्थाना बरोबरच आपले नवे आदर्श शोधले पाहिजेत. रोहित वेमुला,मुक्ता साळवे यांचे विचार स्विकारले पाहिजे. तसेच आपली राजकीय,सामाजिक व आर्थिक गरज काय आहे? हे आजच्या तरुणांनी ओळखले पाहिजे.असे भावपूर्न उदगार युवा धम्म प्रवचक प्रतीक पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी धम्ममित्र अजय तांबे,संतोष पाटणकर,सरपंच अशोक पाटील,मोहन पगारे,दीपक कोर्लेकर,प्रा.वसीम सय्यद यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!