रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लबला मान्यता

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात एक वर्षापूर्वी नव्याने स्थापन करण्यात रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत युवक आणि युवतीसाठी रोट्रॅक्ट क्लब खारेपाटण ची स्थापना करण्यात आली असून नुकतीच या क्लब ला सिंधुदुर्ग झोन मधून मान्यता मिळाली असून याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र रोटरी क्लब ऑफ खारेपाटण ला प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनापासूनच समाजसेवेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने खारेपाटण येथे हा रोट्रॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला असून नुकताच या क्लब ला गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल रोटरी व रोट्रॅक्ट इन्कक्लेव कार्यक्रमात रोटरीचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट रोट. यिनका बाबलोला व डिस्ट्रिक्ट गवर्नर रो.डॉ लेणी द कोस्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते चार्टर्ड प्रमाणपत्र गौरवपूर्ण प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर रो.बिपिनचंद्र गांधी, असिस्टंट गव्हर्नर रो.संजय रावराणे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, सचिव रो.सुबोध देसाई, रो.संतोष पाटणकर, रो.अजय गुरसाळे व रोट्रॅक्ट मेंबर उपस्थित होते.

error: Content is protected !!