वैभववाडी तालुक्यातील विविध रस्तेकामांना मंजुरी द्यावी ; पालकमंत्री नितेश राणेंकडे सभापती सिद्धेश रावराणे, जि प सदस्य प्रमोद रावराणेंची एकत्रित मागणी

वैभववाडी तालुक्याच्या विकासासाठी काका-पुतणे सरसावले

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या विविध रस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी पं स सभापती सिद्धेश रावराणे आणि जि. प.सदस्य प्रमोद रावराणे यांनी लेखी पत्राद्वारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे केली आहे. वैभववाडी तालुक्याच्या राजकारणातील काका- पुतणे एकसाथ सरसावल्याचे दिसून येत आहे. सभापती सिद्धेश रावराणे आणि जि प सदस्य प्रमोद रावराणे यांनी वैभववाडी तालुक्यातून जाणाऱ्या तळेरे कोल्हापूर या नॅशनल हायवेवरील प्रलंबित कामांच्या पुर्ततेसोबतच तालुक्यातील पिडब्ल्यूडी च्या अत्यावश्यक असलेल्या विविध रस्त्यांच्या मंजुरीकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. खारेपाटण भुईबावडा गगनबावडा या राज्यमार्गवरील भुईबावडा बाजारपेठ ते दत्तमंदिर हा 1 किमी लांबीचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, खारेपाटण गगनबावडा राज्य मार्ग 171 वरील तिथवली मोसम, उंबर्डे मेहबूबनगर, कोळपे, तिरवडे तर्फ खारेपाटण,भुईबावडा घाटातील उर्वरित मार्गावरील खराब झालेल्या 2 किमी लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण करणे, भुईबावडा फाटा ते नेर्ले जांभवडे मार्गावरील हेत खिंड ते हेत गावापर्यंत, नेर्ले खिंड ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत जांभवडे फाटा ते जांभवडे गुरववाडी मार्गावरील अर्धा किमी लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण करणे, तिथवली नानिवडे जवलेथर या 2 किमी लांबीच्या उर्वरित रस्त्याचे नूतनीकरण करणे, जांभवडे ते मुर फाटा हा 1 किमी लांबीचा रस्ता नूतनीकरण करणे, करूळ नावळे सडूरे मार्गवरील करूळ ते नावळे दरम्यान अपूर्ण असलेल्या रस्त्याला मंजुरी द्यावी, नाधवडे कोकिसरे खांबाळे या मार्गावर आवश्यक ठिकाणी नूतनीकरण करणे, फोंडा उंबर्डे वैभववाडी बाजारपेठ रस्ता काँक्रीटीकरण करणे, फोंडा उंबर्डे मार्गावरील खांबाळे वाभवे कासार वहाळ एडगाव सोनाळी कुसुर ग गावांतील खराब रस्त्याचे नूतनीकरण करणे ,सांगुळवाडी निमअरुळे सडुरे इजिमा क्र. 10 खडी डांबरी करण करणे.आखवणे असलदे मोंदे मांगवली वेंगसर तिथवली रस्ता इजिमा क्र.4 खडी डांबरी करण करणे,कुसुर पवारवाडी तिरवडे इजिमा क्र.5 खडी डांबरी करण करणे,वैभववाडी सांगुळवाडी नावळे इजिमा क्र.9 खडी डांबरीकरण करणे.ग्रामिण मार्ग लोरे कुर्ली प्र.जि.मा. 06 ला मिळणारा रस्ता ग्रा.मा. 125 खडी डांबरीकरण करणे.आचिर्णे अरुळे रस्ता ग्रा.ममा. 120 5.00 किमी. खडी डांबरीकरण करणे.उपळे आजीवली रस्ता ग्रा.मा.22 1.20 किमी खडी डांबरीकरण करणे,
खांबाळे धनगरवाडी रस्ता ग्रा.मा. 117 3.00 किमी. खडी डांबरीकरण करणे,नानिवडे बौध्दवाडी बेळेकरवाडी रस्ता ग्रा.मा. 02 3.50 किमी. खडी डांबरीकरण करणे, लोरे कुर्ली प्रजिमा 06 ला मिळणारा ग्रामा. 125 रस्ता खडी डांबरीकरण करणे,खांबाळे मोहितेवाडी ग्रा.मा. 115 खडी डांबरीकरण करणे,वायंबोशी ते सांगुळवाडी रस्ता ग्रा.मा. 128 खडी डांबरीकरण करणे करणे ग्रा.मा. 125 लोरे ते घाणेकरवाडी रस्ता ग्रा.मा. 148 खडी डांबरीकरण करणे,
लोरे कुर्ली प्रजिमा 06 ला मिळणारा ग्रामा. 125 रस्ता खडी डांबरीकरण करणे नानिवडे कुडकवाडी ते कातकरवाडी रस्ता ग्रा.मा.1 खडी डांबरीकरण करणे,तिरवडे तर्फे सौंदळे ते घागरेवाडी रस्ता ग्रा.मा. 23 खड़ी डांबरीकरण करणे,उपळे सिध्देश्वर देवालय रस्ता ग्रामा क्र. 25 खडी डांबरीकरण करणे,
आखवणे गुरववाडी रस्ता ग्रा.मा. 29 खडी डांबरीकरण करणे भूईबावडा पहिलेवाडी ते गणीवाडी ग्रा.मा. 35 खडी डांबरीकरण करणे रणे.
रिगेवाडी जोडरस्ता ग्रा.मा. 38 खड़ी डांबरीकरण करणे, हेत धनगरवाडी रस्ता ग्रा.मा. 39 खडी डांबरीकरण करणे,तिरवडे तर्फ खारेपाटण रा.मा.172 ते लोखंडी साकवापर्यंतचा रस्ता ग्रा.मा.44 खडी डांबरीकरण करणे.नापणे जोड रस्ता ग्रा.मा. 74 खड़ी डांबरीकरण करणे नापणे रेल्वेस्थानक ते कोकाटेवाडी कुसूर रस्ता ग्रा.मा. 75 खडी डांबरीकरण करणे,नाधवडे हरिजनवाडी रस्ता ग्रा.मा. 79 खडी डांबरीकरण करणे.रा.मा. 178 ते नाधवडे- नवलादेवीवाडी ताम्हणकरवाडी ब्राह्मणदेव वाडी ग्रा.मा. 85 ला मिळणारा ग्रा.मा. 86 खडी डांबरीकरण करणे,नाधवडे ब्राम्हणदेववाडी रस्ता ग्रा.मा. 85 खडी डांबरीकरण करणे, कोकीसरे कुंभारवाडी रस्ता ग्रा.मा. 90 खडी डांबरीकरण करणे,कोकिसरे नारकरवाडी रस्ता ग्रामा क्र. 163 खडी डांबरीकरण करणे, कोकीसरे बांबरवाडी रस्ता ग्रा.मा. 100 खडी डांबरीकरण करणे.नाधवडे भटवाडी रस्ता ग्रा.मा. 81 खडी डांबरीकरण करणे आदी रस्ते कामांना मंजुरी देऊन आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.तसेच तळेरे वैभववाडी गगनबावडा कोल्हापूर या नॅशनल हायवे क्रमांक 166 वरील अपूर्णावस्थेत असलेले कोकिसरे रेल्वे फाटक आरयुबी चे जोडरस्ते, आरयुबी ब्रिज, नाधवडे तसेच कोकिसरे येथील खराब रस्त्याचा पृष्ठभाग , महामार्गाला जोडणारे ग्रामपंचायत रस्ते, पायवाटा, महामार्गाला आवश्यक असणारे प्रवासी थांबे, मार्ग निवारा, रोड फर्निचर, आवश्यक ठिकाणी दिवाबत्ती, गटार, पादचारी मार्ग,आधुनिक गतिरोधक मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया,महामार्गावरील वैभवाडी बाजारपेठमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणीही
पं स सभापती सिद्धेश रावराणे आणि जि प सदस्य प्रमोद रावराणे यांनी संयुक्तपणे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!