अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग मित्रप्रतिष्ठान शाखा कणकवली व उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताचा तुटवडा भासू नये, या सामाजिक भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. एका रक्तदानातून गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाच्या माध्यमातून साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी सुशील परब, मकरंद सावंत आणि विनू महाडीक यांनी पुढाकार घेतला असून, नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!