गुरु-शिष्य परंपरेचा जागर; कुणकवण दत्त मंदिरात भक्तिमय गुरुपूजन सोहळा
देवगड (प्रतिनिधी) : कुणकवण दत्त मंदिरात गुरुपूजन सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने गुरु शिष्य व भजनप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी गुरुवर्य सन्मा. बुवा तुकाराम तावडे, सुभाष चव्हाण,किशोर तावडे, गणेश घेवडे,तानाजी कदम, सदाशिव कदम, संतोष तळेकर, रघुनाथ परब, बाळू हर्याण, ऋतिक गांगण, शुभम टुकरूल, ऋषिकेश जनक, मयूर पांचाळ, गणेश मेस्त्री, शुभम पाळेकर, ईश्वरी कदम तसेच पखवाज विशारद दिपक समजीस्कर, हरिदास घेवडे, पखवाज वादक भास्कर मेस्त्री, रितेश मेस्त्री, अक्षय मेस्त्री, अंकित घाडी, केशव मेस्त्री, गुरुनाथ चव्हाण, विजय मेस्त्री आदी गुरु शिष्य मंडळी उपस्थित होती.
उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर तुकाराम तावडे, सुभाष चव्हाण, सदाशिव कदम, गणेश घेवडे, विनायक पाताडे, अनंत ठाकूर देसाई, किशोर तावडे, सुहास सरवणकर आदी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. गुरुचरण पूजा व आरती नंतर उपस्थित शिष्य मंडळींनी आपल्या सुस्वर अभंग गायनांनी उपस्थित्यांची मने जिंकली. या कार्यक्रमास भजनी बुवा, पखवाज वादक व भजन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुणकवन गावठणवाडीतील सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रथमेश जनक यांनी मानले.














