सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दि.29/08/2026 रोजी सायंकाळी 18.20 वा.चे मानाने कुडाळ पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना काही इसम हे प्रतिबंधीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार असल्याबाबत विश्वसनीय बातमी मिळालेवरून, त्याबाबत वरीष्ठांना माहिती देवून दोन पंच, वजनकाटाधारक व वनरक्षक यांचेसह पणदूर ते कडावल जाणारे डांबरी रस्त्यालगत कुलस्वामीनी एंटरप्रायझेस बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे कार्यालयाच्या बाजूला सापळा रचून तेथे एक काळया रंगाची होंडा कंपनीची युनीकॉर्न मोटारसायकल असून तिचे पुढे व मागे MH 07 AN 5294 असा आरटीओ क्रमांकच्या व एक ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इर्टीगा चारचाकी गाडी असून तिचे पुढे व मागे MH 07 AS 3747 असा आरटीओ क्रमांकच्या वाहनातून आलेले आरोपी अनुक्रमे 1) संकेत संतोष चव्हाण, वय-26 वर्षे, रा.रवळनाथनगर, ओरोस मूळ रा. निरूखे, ता.कुडाळ 2)महेश लक्ष्मण रेवणकर, वय-35 वर्षे, सध्या रा. कुवारबांव रत्नागिरी मूळ रा. रेवंडी,ता.मालवण, 3) अमेय पुंडलिक देसाई, वय-31 वर्षे, रा. ओरोस रवळनाथ नगर, ता.कुडाळ, 4) अमित अरूण अणावकर, वय-39 वर्षे, रा. अणाव,ता.कुडाळ यांना शीताफीने ताब्यात घेतले असता त्यांचेकडे रू.2 कोटी 37 लाख 30 हजार किंमतीच्या 2 किलो 373 ग्रॅम वजनाच्या प्रतिबंधीत व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने ताबे कब्जात बाळगून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले म्हणून पंचनामाअंतर्गत कारवाई करून वरीलप्रमाणे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस), गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण 2 कोटी 46 लाख किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून कुडाळ पोलीस ठाणे येथे त्यांचेविरूध्द वन्यजीव(संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39,42,43,44,48,51 प्रमाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.श्री.दिपक शेलार, परि. पोलीस उपअधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, HC विल्सन डिसोजा, आशीष जामदार, PC अमर कांडर यांच्या पथकाने केलेली आहे.









