मालवण (प्रतिनिधी) : सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी मालवण यांचेकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सन्मेश सुरेश परब, दांडी, मालवण (नौका मालक, वय 49 वर्षे), सुयोग सन्मेश परब, दांडी, मालवण (नौका मालक यांचा मुलगा, वय 22 वर्षे), अक्षय हनुमंत राणे, दांडी, मालवण (खलाशी, वय 30 वर्षे) हे सन्मेश सुरेश परब यांची मासेमारी नौका सागरिका IND MH 5 MM 1484 घेऊन मासेमारीसाठी गेले असता आज दिनांक 01.09.2026 रोजी सकाळी 5.30 ते 6.00 दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करीत असताना सदर नौका बुडाली.
सुयोग सन्मेश परब यांना जयदेव लोणे यांच्या नौकेने पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सदर घटनेत सन्मेय सुरेश परब, नौका मालक आणि अक्षय हनुमंत राणे, खलाशी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या दोन्ही व्यक्तींचा मृतदेह सापडला आहे.












