फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत फोंडाघाटच्या वतीने गावातील 10 वी, 12 वी, शिष्यवृत्ती यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलांचा तसेच सैन्यामध्ये अग्निवीर, पोलीस विभाग यामध्ये निवड झालेल्या तरुणांचा त्याचप्रमाणे देशपातळीवर वेटलिफ्टिंग मध्ये चमकलेला हर्ष सावंत यांचा सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवर यांनी उपस्थित विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत सदस्य मिथिल सावंत, मिलिंद लाड, अमित चव्हाण, विठ्ठल लाड, प्राची धुरी, जयेश भोगले, अनिकेत पारकर, सायली तेली, न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचे मुख्याध्यापक प्रसाद पारकरसर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष टक्के, फोंडाघाट शाळा न.1 च्या मुख्याध्यापक श्रेया नानचे, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जोईलसर यांनी केले तर आभार मनिषा चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.
फोंडाघाट ग्रा.पं. ची गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप












