जुन्या आठवणींना उजाळा…मैत्रीच्या नात्यांना नवा स्पर्श !

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती !

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये आज ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळावा’; आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीचा होणार जागर !

बांदा (प्रतिनिधी) : शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या अविस्मरणीय आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित हा स्नेहमेळावा आज, बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडणार आहे. यावेळी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि आयुष्यभर जपलेली मैत्रीची नाती यांचा पुन्हा एकदा अनुभव घेण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अनेक वर्षांनंतर जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट, शिक्षकांच्या आठवणी, शाळेतील रम्य क्षण आणि बदलत्या काळातील शाळेची वाटचाल यामुळे वातावरण भावूक आणि उत्साहपूर्ण होणार आहे.

“शाळेने दिलेल्या शिक्षण, संस्कार आणि आयुष्यभर जपलेल्या मैत्रीच्या नात्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेसाठी काहीतरी योगदान देण्याची, शाळेच्या प्रगतीत सहभागी होण्याची आणि नव्या पिढीशी आपले नाते जोडण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

🌺 शाळा तीच… चेहरे नवे… पण आठवणी मात्र सदैव ताज्याच!

माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी भारून जाणार असून, “चला, आपण सगळे एकत्र येऊया… आपल्या शाळेचा सन्मान वाढवूया!” या भावनेने या स्नेहमेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास सावंत,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निलेश परब
माजी मुख्याध्यापक येजरे सर, नाईक सर , प्रशालेचे मुख्याध्यापक वरक सर इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!