कणकवली (प्रतिनिधी) : मामाच्या गृहप्रवेश समारंभासाठी आलेल्या भाच्याचे हार्ट अटॅक ने निधन झाल्याची दुःखद घटना 24 मे रोजी सकाळी 8 वाजता कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात घडली. अमित लक्ष्मण गावकर ( वय 46, मुलुंड , मुंबई ) असे मृत युवकाचे नाव आहे. अमित हा आपला मामा विजय गावकर ( कुणकेरकर ) यांच्या गृहप्रवेशासाठी शिवडाव (मधली गावकरवाडी ) येथे आला होता. बुधवार 23 मे रोजी गृहप्रवेश संपन्न झाला. आज सकाळी त्याला अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने नातेवाईकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचाराआधीच अमित याचा मृत्यू झाला होता.