बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सन्मान नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी रात्री पार पडला. यावेळी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या अलौकिक कार्याने कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी राजेश माळवदे, प्रा. हेमंत महाडिक आणि डॉ. अर्णव पिसे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुभाष वरुणकर, डॉ. सुहास पिसे, अनंत कुबडे, आप्पा कल्याणकर, प्रवीण वरुणकर, मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर डंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेश माळवदे म्हणाले की, बाजारपेठ मित्र मंडळाकडून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक कार्यक्रम वर्षभर राबवत असतात. त्यातून त्यांच्या सामाजिकतेचे दर्शन दिसून येते. माझा हा सन्मान घरचाच असून तो माझ्यासाठी अत्यंत जवळचा आहे. यावेळी प्रा. डॉ. हेमंत पिसे, डॉ. अर्णव पिसे यांनी मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!