जिल्हा परिषदेच्या ५.३३ कोटींच्या आराखड्याला बहुमताने मंजुरी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या रिक्त जागेवर संजय गावडे यांची निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय १६ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या सन २०२६- २७ च्या जिल्हा परिषद आराखडयातील ५ कोटी ३३ लाख १२ हजार ९३० रुपयाच्या आराखड्यास आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली तर पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती वरील सदस्यांच्या रिक्त जागी उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले सदस्य संजय गावडे यांची निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली आज येतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली यावेळी सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, उपाध्यक्ष दादा साईल, वित्त सभापती संतोष साटविलकर , शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ,महिला बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर , समाज कल्याण सभापती रुहिता तांबे , यांच्यासह खातेप्रमुख अधिकारी , समिती सदस्य उपस्थित होते .

सभेच्या सुरुवातीस दिवंगत ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर ,जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती एस टी सावंत,तसेच वर्दे येथील महाविद्यालयिन विद्यार्थिनी दामिनी पालव हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सोळाव्या वित्त आयोगाच्या आराखड्यास मंजुरी देणे या विषयावर सदस्य राजन चिके यांनी आक्षेप घेत पंधराव्या वित्त आयोगाच्या कामामध्ये आम्ही सुचवलेली कामे का घेतली नाही तसेच १६ व्या वित्त आयोगात मंजुरीसाठी ठेवलेली कामाची यादी का जोडली नाही असा प्रश्न उपस्थित केला यावर सत्ताधारी सदस्य आणि विरोधक सदस्य यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत मोठा गदारोळ झाला या गदारोळात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी सदस्यांनी सोळाव्या वित्त आयोगाच्या आराखड्यास बहुमताने मंजुरी दिली या बाबत नाराजी व्यक्त करत विरोधी सदस्य संजय गावडे रुपेश पावसकर राजन चिके, गुरु सडवेलकर संजय नाईक यांनी सभा त्याग केला

आजच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत संवर्धन व दुग्ध शाळा समितीवर रिक्त एका जागेवर सदस्याची निवड करणे बाबत विषय, विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला होता या अनुषंगाने उभा दांडा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले संजय गावडे यांची निवड करण्यात आली

१६ व्या वित्त आयोगाच्या बंधित साठी ५० टक्के निधी २ कोटी ६६ लाख ५६ हजार ४६५ रूपये आणि अबंधित साठी २ कोटी ६६ लाख ५६ हजार ४६५ रूपये अश्या एकूण ५ कोटी ३३ लाख १२ हजार ९३० रुपयांच्या आराखडयाला मजूरी देण्यात आली.

आम्ही पाकिस्थानी नाही
आराखड्याच्या मंजुरीवरून सभेत गदारोळ झाला यावेळी सदस्य राजन चिके यांनी १५ वित्त आयोगातील जी कामे आम्ही दिली ती का घेतली नाही ,हा मतदारावर अन्याय आहे .आम्ही पाकिस्तान मधून आलो नाही, तुम्ही बहुमताच्या जोरावर आमचे म्हणणे फेटाळून लावत असाल तर या घटनेचा निषेध करतो म्हणत सभागृह सोडला

error: Content is protected !!