प्रदीप साटम यांचे लाखोंचे नुकसान
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गा सध्या विजांच्या गडगडाटासह अनेक भागात परतीचा पाऊस सुरू आहे.कणकवली तालुक्यातील नरडवे परिसरात सोमवारी दुपारी 2.30 वा च्या सुमारास अचानक वीज कोसळली त्यात नरडवे पिंपळवाडी येथील प्रदीप अंकुश साटम यांच्या दोन म्हशी जागीच गतप्राण झाल्या. त्यामुळे शेतकरी प्रदीप साटम यांचे सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गच्या विविध भागात सोमवारी दुपारनंतर पाऊस व विजांचा गडगडाट झाला नरडवे परिसरात असाच पाऊस व विजांचा गडगडाट सुरू होता. नरडवे पिंपळवाडी येथील शेतकरी प्रदीप साठम यांनी आपल्या दोन म्हशींना घराजवळील वहाळातील डोहाळ बसविले व चारा कापून घरी ठेऊन परत येत असतानाच कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने पाण्यात बसलेल्या दोन म्हशी जागीच गतप्राण झाल्या.याची माहिती मिळाल्यानंतर नरडवे सरपंच गणपत सावंत, उपसरपंच विनोद बागवे, नरडवे सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमाकांत सावंत, पोलीस पाटील गुरुसंदेश साटम व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फडकर, तलाठी अजय मांडेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. विजांच्या गडगडात होत व त्यानंतर विज कोसळल्याने प्रदीप साटम यांच्या दोन गाभण म्हशी मृत झाल्या असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून शेतकरी प्रदीप साटम यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नरडवे गावातील ग्रामस्थांमधून होत आहे











