सिंधु.बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी जयेश सावंत, तर उपाध्यक्षपदी अनिता राठोड यांची निवड !

फोंडाघाट सुपुत्राच्या निवडीमुळे गावांत आनंदाचे वातावरण !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बँक स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिंधुदुर्गच्या नवीन संचालक मंडळाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी जयेश सावंत साहेब आणि उपाध्यक्षपदी अनिता राठोड यांची एकमताने निवड करण्यात आली. चर्चा- राजकारण मतभेद यावर मात करत ग्राहकांचे आणि बँकेचे तसेच सोसायटीचे हित लक्षात घेऊन सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याच्या विचारावर सहमतीने या दोघांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल बँकेच्या कर्मचाऱ्यांसह सहकार क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवड झाल्यानंतर संस्थेच्या वतीने आणि सभासदांकडून त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष जयेश सावंत आणि उपाध्यक्ष अनिता राठोड यांच्या कुशल नेतृत्वाखाली सिंधु बँक स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, सभासदांचे हित जोपासले जावे आणि संस्थेच्या विकासाला एक नवी दिशा व नवी उंची प्राप्त व्हावी, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस संपूर्ण स्टाफ आणि हितचिंतकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.. त्यामुळे सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड ही बाब संस्थेला गौरवास्पद आणि यापुढे मार्गदर्शक ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. जयेश यांच्या निवडी फोंडाघाट मधील मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत असून त्याचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!