कुडाळ आरएफओ चेतन पाटील यांच्या पथकाची कौतुकास्पद कामगीरी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वाघ नखांच्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने कुडाळ बस डेपो परिसरात सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून वाघाचे दात नखे आणि सोन्यात मढवलेले सुळे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली यात वेंगुर्ले एसटी डेपो च्या शिपायाचा समावेश आहे. या कारवाईनंतर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा वाघाचे अस्तित्व आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत, असल्याचे अधोरेखित झाले आहे.
काल दुपारी साधारणता दीड वाजलेपासून हा सापळा लावण्यात आला होता. त्यानंतर मुख्य संशयिताने वेंगुर्ला बस डेपो मध्ये विक्रीचा व्यवहार करण्यासाठी बोलावले. विक्रीचा व्यवहार करत असताना कॅश आणली का? याची खात्री केली आणि तिथून मग पुढे कुडाळला जातो. मी नंतर तिथे तुम्हाला वाघ नखे मिळतील, असे सांगून कुडाळला पाठवलं मग सापळा पुन्हा कुडाळला रचला गेला आणि त्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४७, रा. कामतवाडी वायंगणी ता. वेंगुर्ला) व्यवसाय राज्य परिवहन महामंडळ वेंगुर्ला बस स्थानक शिपाई, विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे ता. कुडाळ), मुनाफ इस्माईल मुकादम, (वय ४०, रा. अनपूर विजयदुर्ग ता. देवगड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
या कारवाईत वन्यप्राण्यांचे दात, नखे आणि सोन्यात मढवलेले सुळे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, २ नोव्हेंबरला वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना वाघनखे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ आणि त्यांच्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचला. या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकात शिपाई म्हणून शासकीय कर्तव्यावर असताना, त्याने बनावट ग्राहक म्हणून गेलेल्या वनाधिकाऱ्यांना वेंगुर्ला बसस्थानकात बोलावले. तेथे वाघनखांच्या विक्री व्यवहाराची खातरजमा करून १२ वाघनखांच्या विक्रीचा व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानंतर वाघनखे घेऊन एक व्यक्ती कुडाळ बस डेपो येथे येणार असून, त्याच्याकडे रोख रक्कम देण्यास सांगण्यात आले. यानुसार वनाधिकाऱ्यांनी कुडाळ बस डेपो परिसरातील काळप नाका येथे सापळा रचला. आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २ च्या माध्यमातून आरोपी क्रमांक ३ याला वाघनखे दाखविण्यासाठी पाठविले. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच वनाधिकाऱ्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले. वन्यप्राण्यांचे अवयव जप्तआरोपींच्या अंगझडतीमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये वन्यप्राण्याचा ५ सेंमी लांबीचा एक दात, ४ सेंमी लांबीची दोन नखे तसेच सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे (२ सेंमी लांबीचे) यांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांची मृगयाचिन्हे तयार करणे आणि विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगणे, या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी वन्यप्राण्यांची नखे विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा गुन्हा मान्य केल्याने त्यांना अटक करून कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने आरोपी क्रमांक १ व २ यांना दोन दिवसांची वनकोठडी, तर आरोपी क्रमांक ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली. वन्यजीव तस्करीविरोधात विशेष मोहीमसिंधुदुर्ग जिल्हा हा पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला जैवविविधतेने समृद्ध जिल्हा आहे. वाघांचे पुरातन अस्तित्व असलेल्या या जिल्ह्याचा कर्नाटकातील भीमगड अभयारण्य, गोव्यातील भगवान महावीर अभयारण्य, महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सावंतवाडी वनविभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वन्यजीव तस्करीसंदर्भात कोणाकडेही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वैभव भिसे, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि चालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.
काल दुपारी साधारणता दीड वाजलेपासून हा सापळा लावण्यात आला होता. त्यानंतर मुख्य संशयिताने वेंगुर्ला बस डेपो मध्ये विक्रीचा व्यवहार करण्यासाठी बोलावले. विक्रीचा व्यवहार करत असताना कॅश आणली का? याची खात्री केली आणि तिथून मग पुढे कुडाळला जातो. मी नंतर तिथे तुम्हाला वाघ नखे मिळतील, असे सांगून कुडाळला पाठवलं मग सापळा पुन्हा कुडाळला रचला गेला आणि त्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी करून त्यांना ताब्यात घेतले आहे. रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय – ४७, रा. कामतवाडी वायंगणी ता. वेंगुर्ला)
व्यवसाय राज्य परिवहन महामंडळ वेंगुर्ला बस स्थानक शिपाई, विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे ता. कुडाळ) , मुनाफ इस्माईल मुकादम, (वय ४०, रा. अनपूर विजयदुर्ग ता. देवगड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत
या कारवाईत वन्यप्राण्यांचे दात, नखे आणि सोन्यात मढवलेले सुळे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, २ नोव्हेंबरला वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना वाघनखे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ आणि त्यांच्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचला. या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकात शिपाई म्हणून शासकीय कर्तव्यावर असताना, त्याने बनावट ग्राहक म्हणून गेलेल्या वनाधिकाऱ्यांना वेंगुर्ला बसस्थानकात बोलावले. तेथे वाघनखांच्या विक्री व्यवहाराची खातरजमा करून १२ वाघनखांच्या विक्रीचा व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानंतर वाघनखे घेऊन एक व्यक्ती कुडाळ बस डेपो येथे येणार असून, त्याच्याकडे रोख रक्कम देण्यास सांगण्यात आले. यानुसार वनाधिकाऱ्यांनी कुडाळ बस डेपो परिसरातील काळप नाका येथे सापळा रचला. आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २ च्या माध्यमातून आरोपी क्रमांक ३ याला वाघनखे दाखविण्यासाठी पाठविले. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच वनाधिकाऱ्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले. वन्यप्राण्यांचे अवयव जप्तआरोपींच्या अंगझडतीमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये वन्यप्राण्याचा ५ सेंमी लांबीचा एक दात, ४ सेंमी लांबीची दोन नखे तसेच सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे (२ सेंमी लांबीचे) यांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांची मृगयाचिन्हे तयार करणे आणि विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगणे, या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
आरोपींनी वन्यप्राण्यांची नखे विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा गुन्हा मान्य केल्याने त्यांना अटक करून कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने आरोपी क्रमांक १ व २ यांना दोन दिवसांची वनकोठडी, तर आरोपी क्रमांक ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली. वन्यजीव तस्करीविरोधात विशेष मोहीमसिंधुदुर्ग जिल्हा हा पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला जैवविविधतेने समृद्ध जिल्हा आहे. वाघांचे पुरातन अस्तित्व असलेल्या या जिल्ह्याचा कर्नाटकातील भीमगड अभयारण्य, गोव्यातील भगवान महावीर अभयारण्य, महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सावंतवाडी वनविभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वन्यजीव तस्करीसंदर्भात कोणाकडेही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वैभव भिसे, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि चालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.









