चिपी ते नवी मुंबई लवलरच दररोज विमान उड्डाण, वेळापत्रक जाहीर

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा ही दररोज असणार असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे द्विट निवृत्त आय.ए. एस. अधिकारी दीपक कपूर यांनी केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दीपक कपूर काम पाहतात. त्यांनी द्विट करत म्हटले आहे की, सिंधुदुर्ग ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा ही दररोजची असेल. हे विमान नवी मुंबईहून सकाळी ७:५५ वाजता उड्डाण करेल आणि सकाळी ९:०५ वाजता सिंधुदुर्ग येथे उतरेल. त्यानंतर सिंधुदुर्गहून सकाळी ९:२५ वाजता उड्डाण करून सकाळी १०:३५ वाजता नवी मुंबईत उतरेल अशी माहिती द्विट करत दिली. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबतची माहिती दिली असून यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!