बांदा (प्रतिनिधी) : बांदा मराठा समाजाच्या वतीने बांदा येथील तलाठी कार्यालयास छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. समाजाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कार्य आणि स्वराज्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बांदा तलाठी कार्यालयात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात बांदा तलाठी फिरोज खान यांच्याकडे बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सुपूर्द करण्यात आली.
शासकीय कार्यालयांमध्ये महाराजांची प्रतिमा असावी आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, उपाध्यक्ष विनोद सावळ, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य भूषण सावंत, लवू रेडकर, सदस्या सौ. अवंती पंडित, सौ.लक्ष्मी सावंत, माजी खजिनदार राकेश परब, अजित दळवी आदी मराठा बांधव उपस्थित होते.











