युवा संदेश प्रतिष्ठान ची सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा ५ फेब्रुवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर संपन्न होणार असून जिल्हा भरातून ७५४२ विद्यार्थी नोंदणी झाले आहेत. २री ३री, ५वी, ६वी व ७वी या इयत्तांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे – विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे

@ फोंडा हायस्कूल
@ जी प शाळा खारेपाटण न १
@ वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
@ शिरगाव हायस्कूल
@ शाळा जामसंडे न १देवगड
@ शाळा कुणकेश्वर न १ देवगड
@ रामगड हायस्कूल
@ आचरा हायस्कूल
@ टोपीवाला हायस्कूल,मालवण
@ वराडकर हायस्कूल कट्टा
@ कुडाळ हायस्कूल,कुडाळ
@ न्यू इंग्लिश स्कूल कसाल
@ वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
@ RPD हायस्कूल ,सावंतवाडी
@ सैनिक स्कूल,आंबोली
@ शाळा माडखोल न १
@ शाळा मळेवाड न १
@ खेमराज हायस्कूल,बांदा
@ न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग
@ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
@ वेंगुर्ला हायस्कूल
@अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी

या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख अडीज लाख रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच ६वी व ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
यावर्षी उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.
युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत”(माजी जी प अध्यक्ष) यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 साठी सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!