नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे,राणेवाडी या गावातील शेतकरी असलेले रहिवासी दत्ताराम शाहू सावंत यांच्या घरचा ३ वर्षाचा बैल जातीचा पाळीव पाडयावर बुधवारी रात्री १२.०० नंतर जंगली बिबट्या वाघाने हल्ला करून ठार मारले.ही घटना दि.२६ जानेवारी गुरवारी रात्री २.३० च्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरन पसरले आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की, शेर्पे राणेवाडी येथील शेतकरी दत्ताराम शाहू सावंत यांच्या घराशेजारी असलेल्या कावनात गुरे बाधलेली असताना काळा रंगाचा घरघुती पाडा याच्यावर गुरवारी रात्री हल्ला करून अक्षरशः ठार मारले. वाघाचा हल्ला एवढा भयानक होता.की पाडयाचा कोतळा बाहेर काढून वाघाने तो तेथेच बसून खल्ला आहे. या दुर्देवी घटनेत अन्य गुरावर वाघाने हल्ला न केल्यामुळे सुदैवाने ती वाचली.दरम्यान या घटनेत शेतकरी दत्ताराम सावंत यांचे सुमारे ४०,००० हजार रुपयांचे नुकसान झाले असून वन्यप्राण्यांच्या हल्यामुळे झालेल्या पशू नुकसानीचा ऑनलाईन अर्ज शेतकरी सावंत यांनी संबधित प्रशासनाला पाठविला आहे.
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी यांनी शेतकरी दत्ताराम सावंत यांच्या घरी शेर्पे येथे तातडीने भेट देऊन घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली व पंचयादी घालून अहवाल प्रशासनाला पाठवून दिला.दरम्यान माजी जि प सदस्य रवींद्र जठार यांनी शेर्पे गावासाठी वाघाचा तसेच वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा मिळावा. अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे. तर पिंजरा तातडीने न दिल्यास शेतकरी व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी दिला आहे.














