समर्थ नगरी परिवाराच्या वतीने आयोजन
मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूळ स्थान अक्कलकोट हून समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून ३० मे रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय संदेश स्वानमींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांनी दिले
गेली अनेक वर्षा पासून समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्यावतीने स्वामी नाम प्रसाराचे कार्य राज्यभरात केले जाते . स्वामी समर्थांची पहाटेची काकड आरती , शेजघरातीलस्वामींचे फोटो ,स्वामी समाधीची काकड आरती , फोटो आदी स्वामी भक्ताच्या दर्शनाकरिता सेवा उपलब्ध केली जाते . स्वामीनामाचा प्रसार करणे , श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दरम्यान स्वामी लिखित नामजप सोहळा , गुरुपौर्णिमेच्या वेळी तीन दिवसीय पारायण सोहळा व श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट येथील प्रकट दिन ललिता पंचमी (नवरात्र महोत्सवातील पाचवी माळ ) हा दिवस संपूर्ण राज्यभरात एकत्रित नामजप सोहळ्याचे आयोजन करून साजरा केला जातो . दहा मिनिटात ही नामजपाच्या माध्यमातून आपण स्वामीसेवा करू शकतो असा संदेश देण्याचे कार्य केले जाते .
पुणे येथे महेश कल्याणराव इंगळे (अध्यक्ष – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ) व श्री वे .शा. सं . अण्णू महाराज (श्री स्वामीभक्त चोळपा महाराज यांचे पाचवे वंशज, श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट ) यांच्या शुभ हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये श्री स्वामी समर्थ नाम जयघोषात संपन्न होणार आहे.
पुरस्कार प्राप्त संस्था तथा व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत.
१) पुणे पंजरापोळ ट्रस्ट,गोशाळा भोजापूर भोसरी पुणे नाशिक रोड पुणे, २ ) डॉ. विठ्ठलराव निवृत्तीराव जाधव (विशेष पोलीस महानिरीक्षक से नि महाराष्ट्र ), ३ ) श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर (संस्थापक सचिव ) श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड,
४ ) श्री ह.भ. प. प्रकाश महाराज बोधले
(राष्ट्रीय अध्यक्ष -अखिल भारतीय वारकरी मंडळ ),
५ ) श्री योगगुरु दीपकजी शिळमकर ,पुणे
अध्यात्मिक तथा योगध्यान,
६ )श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू ,पुणे .
( आषाढवारी देहू ते पंढरपूर पालखी सोहळा ),
७ ) श्री मयूर रामदासजी वाजगे
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य , नागपूर शहर ,
८ )श्री रमेश सुग्रीव चावरे (कोल्हापूर ),
९ )श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे,
१० )श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी पुणे,
११)सौ मधुराताई मुकुंद भेलके श्री मसोबा देवस्थान ट्रस्ट खारवडे तालुका मुळशी पुणे,
१२ )श्री. प्राध्यापक फ़ुलचंद चाटे (सर)
संचालक – चाटे शिक्षण समूह पुणे,
१३ )श्री मनोहर भिवाजी उतेकर (कार्याध्यक्ष )
श्री स्वामी समर्थ मंदिर, लोकमान्य नगर, ठाणे ,
१४) श्री मंगेश नरसिंह चिवटे ( जनआरोग्य सेवा),
१५ )श्री नितीन बाबुराव दीक्षित (स्वामी सेवक )
अखंड नामजप सेवा परिवार पुणे.
हा सोहळा पूर्णत्वास नेहण्याकरिता संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे , राज्यस्तरीय समिती अध्यक्ष अँड. विश्वास करमरकर , उपाध्यक्ष सुयोग झेंडे , कार्याध्यक्ष नरेंद्र शिंघवी , सचिव पंकज पाटील, वसंतराव सोनवणे , खजिनदार राजेश त्रिवेदी ,ज्ञानेश्वर शिंदे , संदीप म्हात्रे ,दत्तप्रसाद कुलकर्णी , वनिता झेंडे ,विमलताई बिबवे , वैभव, योगेश कदम आदी परिश्रम घेत आहेत .