आ.नितेश राणेंचा करिश्मा ; दारुम सरपंच,उपसरपंच,ग्रा पं सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

दारूम ग्रा.पं. वर आता एकहाती भाजपाची सत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कणकवली तालुक्यातील दारूम ग्रा पं च्या ग्रामविकास पॅनल च्या सरपंच तेजस्वी लिंगायत, उपसरपंच प्रवीण तळेकर, 6 ग्रा पं सदस्य आणि शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी जि प सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर , आशिये सरपंच महेश गुरव, कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, दारूम माजी सरपंच संतोष तळेकर, माजी सरपंच सुनिंन्द्र सावंत , माजी उपसरपंच भरत चव्हाण ,राजेंद्र तळेकर, प्रदीप तळेकर, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष अक्षय घुगरे, संपत भोगले आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणेंच्या कार्यपद्धतीवर आणि विकासकामांच्या पद्धतीवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून दारूम गावचा सर्वांगीण विकास होईल हा आमचा विश्वास आहे असे भाजपात प्रवेश केल्यानंतर सरपंच तेजस्वी लिंगायत म्हणाल्या.

यावेळी दारूम ग्रामपंचायत सदस्य सदस्य अमित तळेकर,वैशाली कल्याणकर, सानिका राऊत समृद्धी तावडे, प्रभावती चव्हाण,यांनी माजी सरपंच संतोष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रक्ष प्रेवश केला. ग्रामस्थ रवींद्र तळेकर प्रमोद तळेकर सप्निल तळेकर, प्रवीण तळेकर, माजी उप सरपंच अशोक गिरकर,सुरेंद्र तावडे, सदानंद राऊत, रोशन लिंगायत, योगेश लिंगायत, रोहन लिंगायत,विश्वनाथ तळेकर,प्रभाकर गुरव, यशवंत तळेकर, संतोष मोहिते ,माजी सदस्य किरण भोगले, कल्पना तळेकर ,विजय मोहिते, राकेश तळेकर, अजित तळेकर, जनार्दन पवार, सत्यविजय गुरव, प्रभाकर तळेकर, संतोष वारीक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!