प्रजासत्ताक दिनी गोपुरी आश्रमाचा अनोखा आदर्श!

शेती विभागातील कामगार मनीषा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

कणकवली (प्रतिनिधी) : भारताचा प्रजासत्ताक दिन कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाच्या शेती विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कामगार मनीषा जयवंत गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. मनीषा गावडे या खूप वर्षांपासून गोपुरी आश्रमाच्या शेती विभागात कार्यरत आहेत. ध्वजारोहणाचा मान त्यांना देऊन त्यांच्या कामाचा गोपुरी आश्रमामार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, गोपुरी आश्रमाचे संचालक विनायक मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, सचिव मंगेश नेवगे, बाळकृष्ण सावंत, पंढरीनाथ माणगावकर, राजाराम गावडे, शेती कामगार लक्ष्मण परब, पुंडलिक कदम, भरत डीकवलकर, नितीन जावळे, बाबू राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!