संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची 29 रोजी त्रैमासिक सभा

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवार 29 जानेवारी 2023 रोजी गोपुरी आश्रम सभागृह सकाळी ठीक 10.30 वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष संजयजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

तसेच सर्व विभागीय पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांची राज्य कार्यकारणी सोबत संयुक्त सभा दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

रोहिदास समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आयोजित करणेबाबत तसेच समाजाबाबत असलेल्या राज्यस्तरीय समस्या यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी या सभेला राज्य संचालक आणि पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव आणि जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी, आजीव सभासद, समाजबांधव आणि हितचिंतक यांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!