पत्रकार अस्मिता गिडाळे व अनिता कदम यांना महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार पत्रकार अस्मिता गिडाळे व अनिता कदम यांना सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. गेल्या तीन वर्षात या पुरस्कार विजेत्यानी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार निवड समितीने ही दोन नावे निश्चित करत त्यांना पुरस्कार जाहीर केला व त्याचे वितरण आज करण्यात आले. यावेळी वायंगणी सरपंच अस्मि लाड, उपसरपंच प्रताप फाटक,ग्रामसेवक -श्री.नलावडे, श्रद्धा बाणे,तसेच ग्रामपंचायत सदस्य सदस्य-संभाजी बाणे,उज्जवला लाड,वनिता सुतार,भारती परब,भाग्यश्री बाणे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय फाटक ,डाटा ऑपरेटर सौ.मयेकर ,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!