विलवडे धरण होणार गाळमुक्त ; प्रांताधिकारी पानवेलकर यांच्या हस्ते शुभारंभ

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी रामचंद्र धोत्रे, ग्रामपंचायत सरपंच प्रकाश दळवी, भूमी अभिलेख कार्यालय निरीक्षक विनायक ठाकरे, जलसंधारण अधिकारी तुषार यादव, सौरभ आहिरे, मंडळ अधिकारी मालवणकर अशासकीय संस्था म्हणून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, बाळकृष्ण शेळके, हनुमंत गवस, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मुकुंद परब, तलाठी अक्षवी भिंगारे, पोलीस पाटील पांडुरंग कांबळे गावातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी योजनेच्या अमलबजावणीसाठी सर्व शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देणार आहेत या बाबत माहिती देण्यात आली. यावेळी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी शिवारामध्ये घेऊन जाण्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आली.

error: Content is protected !!