सिंधुदुर्ग(प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त खेळी केली आहे. भाजपच्या बड्या नेत्यालाचा शिवसेनेने आपल्या गळाला लावले आहे. भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कॅबिनेटमंत्री दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी खेळण्यात आली आहे
शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे अद्वय हिरे मालेगावमध्ये कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना टक्कर देणार आहेत. अद्वय प्रशांत हिरे हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते आहेत. मालेगावात हिरे यांचा दाडंगा जनसंपर्क आहे. याचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच प्रवेश केला आहे. याचा भाजप आणि शिंदे गटाला जबरदस्त फटका बसणार आहे.
भाजपा नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.













