सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी अमोल भोगले आणि उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस, सई कंचावडे (स्नेहल हजारे)

कार्याध्यक्षपदी अभिषेक नाडकर्णी, सचिवपदी सौ. तन्वी भट, तर खजिनदारपदी सुशील परब यांची फेरनिवड…..

कणकवली (प्रतिनिधी): सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या कणकवली तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्षपदी अमोल भोगले आणि उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस, उपाध्यक्ष सई कंचावडे,
कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, सचिवपदी तन्वी भट, सहसचिव सचिन जाधव तर खजिनदारपदी सुशील परब, सहखजिनदार किरण सामंत यांची फेरनिवड करण्यात आली.
सदस्यपदी सिद्धी वरवडेकर, श्रद्धा पाटकर, ऋषिकेश जाधव, योगेश जाधव, पवन भोगले, मयूर राणे, सदाशिव राणे, दुर्गाप्रसाद काजरेकर, चंदन सुतार,
सल्लागार – डॉ विद्याधर तायशेट्ये, विनायक मेस्त्री, राजन चव्हाण
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ही रक्तदान, अवयवदान, देहदान आदीसाठी सदैव तत्पर असणारी नोंदणीकृत संस्था आहे. वेळीच रक्तपुरवठा करुन एखाद्याचा जीव वाचविणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य असुन सामाजिक जबाबदारी म्हणून शासनाच्या धोरणाला अनुसरुन रक्तदान चळवळीच्या विविध कार्यात कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे. संस्थेने सातत्याने अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे.. रक्ताबरोबरच प्लेटलेटस, प्लाझ्मा दानही संस्थेच्या सदस्यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या संस्थेत समावेश आहे. तसेच संस्था जिल्ह्यातील एकूण ७४३ गावामध्ये रक्तदान चळवळीबाबत जनजागृती करत आहे. अशा प्रकारे कार्यरत असणाऱ्या या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कणकवली मावळते तालुकाध्यक्ष अभिषेक नाडकर्णी आणि वैभववाडी-कणकवली विभागीय अध्यक्ष मकरंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कणकवली तालुका कार्यकारिणीची सभा संपन्न झाली, त्यावेळी ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर व जिल्हा सहखजिनदार अमेय मडव यांनी नूतन कार्यकारिणीला सुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!