नगरसेवक उदय मांजरेकर यांचे प्रतिपादन
कुडाळ (अमोल गोसावी) : जिद्द आणि मेहनत यांच्या सहाय्याने आज हे तुम्ही उज्ज्वल यश प्राप्त केलेत आणि या सन्मानास पात्र ठरून आज आपल्या पालकांचे नाव काढलात ही नक्कीच समाधानाची बाब आहे. इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ यांनी आज तुम्हाला पुष्प आणि भेटवस्तू देवून तुमचे कौतुक केले हे निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केले.
इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ आयोजित इयत्ता दहावी आणि बारावी गुणगौरव समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उदय मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष अमृतराव जगताप, सचिव नितीन नेमळेकर, खजिनदार स्वामी सावंत, माजी अध्यक्ष शिवराम सावंत हे उपस्थित होते. यावेळी अमृतराव जगताप यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी अलिशा पाटकर, तनिष कोरगांवकर, तन्मय चव्हाण, तनय चव्हाण, कार्तिकेय सावंत, रिचा चव्हाण, अमृता म्हाडगुत या दहावी उत्तीर्ण आणि ध्रुवा नेमळेकर, निखिलेश साळगांवकर या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
यावेळी भाऊ राऊळ, उमेश चव्हाण, पी. डी. चव्हाण, विठ्ठल चव्हाण, महेश राऊळ, संकेत नेमळेकर, अनिल पाटकर, रश्मी नेमळेकर, भक्ती चव्हाण, गुरुदत्त कुडाळकर आणि मंडळाचे कार्यकर्ते, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी सावंत व प्रास्ताविक आभार नितीन नेमळेकर यांनी केले.










