स्थानिक वाहनांच्या टोलमाफी चा मुद्दा अनुत्तरित ; सोयीसुविधांचे आश्वासन हवेत विरले
कणकवली (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार) कोल्हापूर कार्यालयाकडून एका दैनिकात टोल वसुली बाबत जाहीर सूचना देणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ओसरगाव टोल नाका येथे दि. १४ जून २०२३ रोजी सकाळी ८ वा. पासून वापरकर्ता शुल्क वसूली करणे सुरु होईल. त्यानुसार वाहनांचे दर निश्चित केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग की (दर आणि संकलनाचे निर्धारण) नियम, २००८ (ज्याला यापुढे ‘नियम’ असे म्हटले गेले आहे) चे नियम ३ सह राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९५६ (१९५६ चा ४८) चे कलम ७ अन्वये प्राप्त झालेल्या शक्तींचा उपयोग करून, केंद्र सरकार, याद्वारे महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे जानवली ते पत्रादेवी विभागातील कि.मी. ३९५,००० ते कि.मी. ४६०.४९० पर्यंत (चारपदरी व त्याहून अधिक लेन विभागाच्या उपयोगासाठी) ५९.६७९ कि.मी. चे निरस्ता विभागाच्या लांबीकरीता आणि (६० मी. पेक्षा जास्त लावीसाठी) समतुल्य स्ट्रक्चर्सची तांबी ०.६७५ कि.मी करीता खालील नमूद केलेल्या वाहनांच्या प्रकाराकरीता खाली नमूद केलेप्रमाणे फी आकारणी करीत आहे आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण याना त्याचे अधिकारी अथवा कोणत्याही ठेकेदाराच्या माध्यमातून उपरोक्त फी वसूली करणेकरीता अधिकृत केलेले आहे. सक्षम प्राधिकारी, प्रादेशिक कार्यालय, मुंबई यानी वरील विभागातील फी आकारणी दरांना मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९५६ (१९५६ चा ४८) चे कलम ५ चे अंतर्गत भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांनी प्रसिद्ध केलेली अधिसूचना क्र. का. आ. १३६४ (अ) दिनांक २४ एप्रिल २०२० अन्वये महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ( पनवेल इंदापूर विभागातील कि.मी. ०.००० ते कि.मी. ८४.००० पर्यंत वगळून ) महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपुर्द केला गेला आहे..
कार/ जीप / प्लॅन किंवा हलकी मोटार वाहने, हलकी व्यावसायिक वाहने / मोठी मालवाहू वाहने किंवा मिनी बस ट्रक / बस मल्टी अॅक्सल वाहने अर्धमुलींग वाहने किंवा ५०५ | अवजड बांधकाम मशिनरी (४ व ६ अॅक्सल) मोठ्या आकाराची वाहने (७ किंवा त्याहून जास्त अॅक्सल) एक लेन वाहन नेण्यासाठी १५ रुपये ते ६९५ रुपये असा दर निश्चित सरकारने केला आहे.
जिल्लयांतर्गत नोंदणीकृत व्यावसायिक वाहनासाठी ५० टक्के शुल्क सुट आहे. स्थानिक अवाणिज्य प्रकारच्या वाहनांकरिता मासिक पास शुल्क रू. ३३० आकारले जाईल. या कराची वसुली पथकर अनिक नाव में कोरल असोसिएट्स असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर यांनी जाहीर नोटीस बजावली आहे.














