सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यात जानवली शिवडाव साकेडी फोंडा कणकवली शहरातील एका लॉजमध्ये अंदर बाहर चा पट मांडणाऱ्या नावात “ईश” असला तरी ” नीती ” न पाळणाऱ्या मोरजेच्या कराने आता दाजीपूर ला आपले अंदर बाहर जुगाराचे बस्तान हलवले आहे. आज रविवारी रात्री दाजीपूर च्या गुलाबी हवेत आपल्या सर्व जुगारी साथीदारांसोबत मोरजेच्या कराने अंदर बाहर चा मोठा पट मांडला आहे. जुगार खेळण्यासाठी मोठमोठी हस्ती दाजीपूर ला रवाना झाले आहेत. कणकवली शहरासह तालुक्यात आपले अड्डे बदलून जुगार मांडणाऱ्या मोरजेच्या कराला खाकी ने अलीकडेच तंबी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर डॅडी आणि मोरजे च्या करा ला काही तास बसवून ठेवत मोबाईल चीही झडती घेतल्याचे समजते. स्थानिक आणि जिल्ह्याच्या खाकी वर्दी जे तंबी दिल्यानंतर अखेर शक्कल लढवत या मोरजे च्या करा ने आपला मोर्चा लगत च्या कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर कडे वळवला आहे. दाजीपूर मध्ये आज रात्रभर अंदर बाहर चा पट मोठ्या जोरात सुरू राहणार आहे.त्यासाठी तेथील स्थानिक खाकी वर्दीलाही मॅनेज केल्याचे मेसेज साथीदारांना त्याने दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी राधानगरी पोलिसांनी दाजीपूर मध्ये एका रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता.आता कोल्हापूर चे नूतन एसपी दाजीपूरमध्ये सुरू झालेल्या या जुगार अड्ड्या चा बिमोड कधी करणार हा सवाल आहे.
दाजीपूर मध्ये जुगारींची बैठक सुरू












