आंबडोस सरपंच सुबोधिनी परब व राजेश परब दांपत्याचा करियर मार्गदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांना फलदायी ठरेल

मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आंबडोस सरपंच सुबोधिनी परब व राजेश परब दांपत्याने विद्यार्थ्यांना योग्य करियर निवड करण्यासाठी सुरू केलेला मार्गदर्शन कार्यक्रम खूप चांगला आहे. ग्रामीण भागातील मुले चांगले गुण मिळवून सुद्धा पुढे शिक्षण घेत नाहीत. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खूपच फलदायी आहे. त्यामुळे येथील मुलांनी त्याचा फायदा घ्यावा. या कार्यक्रमाचा व्याप वाढवून हळूहळू तालुका स्तरावर मार्गदर्शन करण्यात यावे. हा कार्यक्रम स्वप्नाला भरारी देणारा आहे. शाळांमध्ये हा कार्यक्रम घ्यावा, असे आवाहन मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी आंबडोस येथील विद्यार्थी मार्गदर्शन व गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले.ग्राम पंचायत इमारत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी गिरीश शिगरे, तलाठी समीरा सावंत, सरपंच सुबोधिनी परब, आयोजक राजेश परब, ग्रामसेवक मोरे, उपसरपंच रामदास नाईक, आंबेरी सरपंच मनोज डीचोलकर, ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, प्रवीण मराळ, श्रद्धा नाईक, माजी सरपंच दिलीप परब, विष्णू परब, आप्पा परब यांच्यासह अन्य उपस्थित होते. आंबडोस पंचक्रोशीतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तसेच गावातील दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

error: Content is protected !!