वाहतूक नियमभंग करताय ? कणकवलीत ट्राफिक हवालदार विनोद चव्हाण यांची आहे करडी नजर

एकाच दिवशी 26 केस दाखल करत 19 हजारांची दंडवसुली

2 दिवसांत 78 केस दाखल करत 60 हजारांची दंडवसुली

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी चांगलाच दणका दिला असून दोन दिवसांत 78 केस दाखल करून 60 हजार 500 रुपयांची दंड आकारला आहे. लायसन्स न बाळगणे , ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण, नंबर प्लेट नसणे, दुचाकीला आरसे नसणे, थांबण्याचा इशारा देऊनही न थांबलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली.

error: Content is protected !!