उमेश वायंगणकर, यामिनी वायंगणकर यांनी शिकवली योगासने
कणकवली (प्रतिनिधी): योगासने करण्याने तन आणि मन दोन्ही सुदृढ होतात. अभ्यासासोबतच नियमित योगासने, प्राणायाम चा सराव केल्यास एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसह सर्वांनीच जीवनात निरामय आयुष्यासाठी योगाभ्यास करावा असे आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी सांगितले. हुंबरठ येथील बी एन विजयकर इंटरनॅशनल स्कुलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त उमेश वायंगणकर, यामिनी वायंगणकर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक दाखवले. हायस्कुलमधील 65 विद्यार्थी तसेच शिक्षकानी योग शिबिरात सहभागी होत योगासने केली. तसेच वायंगणकर यांनी मेडिटेशन प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना त्याचे महत्व आणि फायदे सांगितले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनीही मेडिटेशन केले.










