वैभववाडी (प्रतिनिधी): कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी, येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उत्सपूर्तपणे सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक अक्षय देवलकर सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली त्याप्रमाणे विद्यार्थ्यानी योगासने केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सी. आर. वाडेकर , संस्था संचालक एस. डी. पाटील सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना योगासनांचे महत्व समजावून सांगितले.