आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे पश्चिम जि.प.शाळेला वह्या वाटप

सरपंच संतोष ब्रम्हदंडे यांचा उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले गावचे सरपंच व आमदार नितेश राणे यांचे कट्टर समर्थक भाजप युवा कार्यकर्ते संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्यावतीने आज आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा कुरंगवणे,पश्चिम या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र लाड,ग्रा.प. सदस्य विशाखा राऊत, रवींद्र पवार, अक्षदा सादिकले,सामाजिक कार्यकर्ते अंकुश सदिकले,राजेंद्र लाड , पांडुरंग पांचाळ,दीप्ती पाटील, यशवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी सामजिक जाणिवेतून शाळेतील सर्व विद्यार्थ्याना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वह्या वाटप केले.

error: Content is protected !!