सिंधुदुर्गात ऊन – पावसाचा खेळ ! शेतकरी चिंताग्रस्त

कुडाळ (अमोल गोसावी) : आधीच उशिरा आलेल्या पावसाने शेतकऱ्याचे तोंडचे पाणी पळविले आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात दाखल झालेल्या पावसाने आज पूर्णतः विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मागील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. प्रामुख्याने जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोकणात पडतो. परंतु, सध्या रिमझिम पावसात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज सकाळपासून कोकणात श्रावण सरी बरसत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन पडत असून त्यामुळे श्रावण सुरू झाला का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक सरी पडल्या. त्यामुळे जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुद्धा शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत कोकणातील शेतकऱ्याचे चिंता वाढली आहे. दोन दिवस काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने नांगरणी, पेरणी ही कामे सुरू केली. मात्र, यासाठी आवश्यक असलेला मुसळधार पाऊस होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

error: Content is protected !!