सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शनिवारी कोकण कट्टा ह्या विलेपार्ले येथील या समाजसेवी संस्थेने ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील “बालग्राम प्रकल्पाच्या अनाथ,गरीब,आदिवासी आणि गरजू बालकांसाठी माणुसकीच्या भिक्षाफेरीतून जमा झालेले तीन टन धान्य भेट स्वरूपात दिले आहे. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कट्टाचे खजिनदार सुजित कदम, सचिव सुनील vankundre, जगन्नाथ दादा गावडे, प्रथमेश पवार, विवेक वैद्य यांनी शनिवारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यालयात जावून सदरचे धान्य ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बालग्राम मित्र राजू पाटील यांच्याकडे सुपूर्द केले मागील चार वर्षापासून कोकण कट्टा दरवर्षी ग्राम संवर्धनच्या अनाथ बालकांसाठी धान्याची मदत करत आहे यावेळी माणुसकीच्या भिक्षा फेरीसाठी ज्या-ज्या देणगीदारांनी धान्याची मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने संतोष ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.