रिक्त शिक्षकप्रश्नी श्रावणवासीय आक्रमक ; शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांसह पालकांचे ठिय्या आंदोलन

आचरा (प्रतिनिधी): जो पर्यंत शाळेत शिक्षक संख्या पुर्ण होत नाही. तो पर्यंत शाळेत आमची मुले पाठवणार नाहीत. असा पक्का निर्धार, श्रावण ता. मालवण या गावाने आज घेत, महात्मा गांधी विद्यालय श्रावण नं. १ या शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबऊन ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली. श्रावण शाळेची शिक्षक संख्या ५ होती. जिल्हा शिक्षक बदली वेळी ५ शिक्षकातुन शिक्षण विभागाने तीन शिक्षकांची बदली केली. त्या तीन शिक्षकांपैकी दोनच शिक्षक त्या जागेवर दिलेत. एक शिक्षक भरलाच नाही. उलट या दोन नविन शिक्षकांपैकी एक उपशिक्षक अमित पवार नावाचे शिक्षक कामगिरी म्हणुन दुसर्‍या शाळेवर पाठवला. शेवटी पाच शिक्षकांचे ज्ञानदान फक्त तीनच शिक्षक करत आहेत. यात शिक्षकांची कसरत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, शाळेचे सर्व पालक व ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन १६ जुन २०२३ रोजी गटशिक्षण अधिकारी यांना संबधित शिक्षकाची कामगिरी रध्द करावी असा अर्ज दिला. परंतु अर्ज केराच्या टोपलीत टाकून अर्जाचे अद्यापही लेखी उत्तर न देता, मुख्याद्यापकांना एक मोबाईल मॅसेज पाठवून त्या पवार शिक्षकांना कामगिरीवर कार्यमुक्त केले. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला काहीही माहिती नाही. नंतर ही माहिती मिळताच, व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामपंचायत यांनी, जो पर्यंत शाळेत कामगिरी शिक्षक परत येत नाही, तो पर्यंत शाळेत आमची मुले, , पाठवणार नाहीत. असा पक्का निर्धार, श्रावण शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबऊन पालकांनी केला. तसेच ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली. याबाबत शिक्षण विभागाने लगेच दखल घ्यावी. व विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान थांबवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!