कणकवली ( सत्यवान गांवकर ) : वंदे भारत या 120 किलोमीटर प्रतितास वेगाने कोकणरेल्वे मार्गावर धावणाऱ्या सेमी हायस्पीडट्रेनचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून केले. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसचा शुभरंभाचा प्रवास मडगाव ते मुंबई दरम्यान सुरू झाला.आज दुपारी कणकवली रेल्वे स्थानकावर सिंधुदुर्ग वासियांनी अत्यंत जल्लोषात वंदे भारत ट्रेनचे स्वागत केले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः मडगाव ते मुंबई हा प्रवास वंदे भारत ट्रेन ने केला. कणकवली रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस च्या आगमनाचा ऐतिहासिक क्षण शेकडो सिंधुदुर्गवासियांनी आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सचिव प्रमोद जठार जिल्हाध्यक्ष राजन तेली, कोकण रेल्वे वरिष्ठ अभियंता आर आय पाटील, माजी जि प अध्यक्षा संजना सावंत, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार रमेश पवार, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईनकर, कणकवली विधानसभा प्रचार प्रमुख मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, नासिर काझी, अमोल तेली, माजी सभापती अरविंद रावराणे,माजी सभापती दिलीप तळेकर,माजी उपसभापती प्रकाश पारकर, माजी नगरसेवक संजय कामतेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी नगरसेवक अबिद नाईक, अण्णा कोदे,युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, बंड्या नारकर, उदय पाटील, महेश सावंत,प्रशांत चव्हाण, स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.