चौके हायस्कुलच्या मुलांची सलग ४ वर्षे दहावीची परीक्षा फी भरली स्वखर्चातून
चौके (प्रतिनिधी) : चौके-कट्टा नांदोस येथील कै. कॅप्टन रामकृष्ण गावडे यांचे जेष्ठ चिरंजीव सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे व पुणे महानगर पालीकेचे माजी नगरसेवक दिपक गावडे यांनी आपले आजोबा कै.सिताराम गावडे, वडील कै.रामकृष्ण गावडे यांचा दातृत्वाचा वारसा पुढे ठेवत गेली ४ वर्षे चौके हायस्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी प्रत्येकी ५००/- रु. प्रमाणे विद्यार्थ्यांकडे सुपुर्त केली. यावेळी चौके हायस्कुल स्थानिक कमिटी अध्यक्ष बिजेंद्र गावडे, पत्रकार संतोष गावडे, नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण, मुख्याध्यापक विजय गावकर, अशोक शृंगारे, शंकर गावडे, प्रभाकर गावडे आदी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपक गावडे यांनी सांगितले की आपले आजोबा कै.सिताराम गावडे, कै.वडील रामकृष्ण गावडे यांनी नोकरी करत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांच्या वारसा पुढे ठेवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असून माझे आजोबा गुरुवर्य कै.सिताराम गावडे, कै.सरस्वती गावडे, वडील कै.कॅ. रामकृष्ण गावडे, कै.मनोरमा गावडे, कै.दत्ताराम शृंगारे, कै.सुनंदा शृंगारे, कै.मधुकर गावडे, कै.प्रेमलता गावडे, कै.दशरथ गावडे, कै.राजाराम गावडे, कै.राजश्री गावडे यांच्या स्मरणार्थ मी माझ्या दैनंदिन जीवनात काटकसरीनै जमविलेले पैसे या मुलांना त्यांची दहावीची महत्त्वाची असणाऱ्या परीक्षा फी देत आहे. मुलांकडून आपल्याला फक्त दहावी पास झाल्यावर एक फोन करण्याची मागणी केली विद्यार्थ्याचा एक फोन मला समाधान देऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरानी मुलांना दहावी परीक्षेला मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.