चौके ( अमोल गोसावी ) : १ जुलै, महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे ‘बांधावर ची शाळा’ हा उपक्रम घेण्यात आला.. मुलांमध्ये पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष शेतात जाऊन भात लागवड कशी करावी याची माहिती घेण्यासाठी प्रशाले मार्फत एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शाळा हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर,शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, तसेच संचालिका स्वाती वराडकर, वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी प्रत्यक्ष मुलांसोबत भात लावणीचा आनंद घेतला . यावेळी विद्यार्थ्यांसोबत पर्यवेक्षिका देवयानी गावडे, सहाय्यक शिक्षक प्रकाश कानूरकर, समीर चांदरकर, संजय पेंडुरकर, भूषण गावडे, महेश भाट व इतर शिक्षक उपस्थित होते.













