सुविद्या एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई कडून वायंगणी हायस्कूल मधून दहावीत प्रथम आलेल्या युक्ता सावंत हिचा गौरव

आचरा (प्रतिनिधी): ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेती सण 2022-23 या वर्षा साठी घेतल्या गेलेल्या बोर्डाच्या परीक्षेत 85.80% गुण मिळवून प्रथम आलेल्या कु. युक्ता प्रकाश सावंत हिला सुविद्या एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक कै. वसंत दिनकर मेस्त्री यांच्या स्मरणार्थ 5555 रु शिष्यवृत्ती आणि प्रशस्ती पत्रक देऊन सुविद्या एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबईचे संचालक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पेडणेकर सर, मुख्याध्यापक टाकले, उमेश सावंत, चंदू सावंत, बबन सावंत, संजय सावंत, चिंदर माजी सरपंच रामचंद्र खोत, जितेंद्र तिरोडकर, प्रशाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते, मनोगताच्या वेळी संचालक प्रकाश मेस्त्री यांनी हि शिष्यवृत्ती 10 वी च्या वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रति वर्षी दिली जाणार असल्याचे जाहीर केले तर माजी मुख्याध्यापक पेडणेकर सर यांनी कै वसंत मेस्त्री यांचा पूर्ण जीवन प्रवास सांगितला. प्रास्ताविक मुख्याध्यापक टाकले यांनी तर आभार प्रदर्शन जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!